Technical Analysis Chart Patterns

Technical Analysis Chart Patterns


Technical Analysis Chart Patterns: चार्टचे प्रकार 

  • चार्टचे विविध प्रकार प्रचलित आहेत. जसे की लाईन चार्ट, बार चार्ट,  कॅन्डलस्टिक चार्ट, हेकीन अशीचार्ट, रेनकोचार्ट, कागी, हिस्टोग्राम, बेसलाईन,  माउंटन, वोलूम कॅन्डल, स्टेप, पॉईंट अँड फिगर, वर्टेक्स्ट लाईन, इत्यादी.
  • आपण अतिशय उपयुक्त असे व बाजारात जास्त प्रमाणात पाहिले जाणारे काही महत्वाचे चार्ट कसे असतात ते पाहूया.

काही महत्वाचे चार्ट व त्यांची माहिती 

१. लाईन चार्ट (Line chart) 

  • हे चार्ट आपल्याला एक लाईन प्रमाणे दिसतात. दिसायला सरळ साधे असून दीर्घ कालावधीसाठी या चार्टचा वापर करतात. 
  • डे ट्रेडिंग व शॉर्ट टर्म मध्ये याचा वापर करत नाहीत कारण या मध्ये शेअरचा ओपन, क्लोज, हाय, लो दिसत नाही. 
  • या चार्ट मध्ये क्लोज प्राइजला महत्व दिले जाते. या प्राईज वरुन पुढील दिशा समजते. 
  • या चार्ट वरून शेअरचे सपोर्ट रेसिस्टंट ट्रेंड लाईनने काढता येतात. 
  • दीर्घ कालावधी ट्रेंड पहायचा असेल, तर या मध्ये आपणास अतिशय चांगल्या प्रकारे  पाहता येते म्हणून शेअर बाजारात काही जाणकार ट्रेडर या चार्टच्या सह्याने एखाद्या शेअर मधील फंडामेंटल ही ओळखतात.

२. बार चार्ट ( Bar chart )

  • हा चार्ट एक वेल व एक बिंदू दर्शवितो,प्रत्येक बार आपणास त्या वेळेची ओपन, हाय, लो, क्लोज, किमंत दाखवतो.बार चा  वरील बिंदू आपणस हाय किंमत दाखवितो तर खालील बिंदू लो दाखवतो. डाव्या बाजूची खाच शेअर ची ओपन किमंत सांगते तर उजव्या बाजूची खाच क्लोज किमंत दर्शिवते. 

३.कॅन्डलस्टिक चार्ट ( Candlestick chart )

  • सर्वात लोकप्रिय व संपूर्ण ट्रेडिंग मध्ये जगभरात वापरले जाणारे चार्ट म्हणजे कॅन्डलस्टिक होय.
  • या चार्ट मध्ये आपणास कॅन्डल दोन रगांच्या दिसतात. पहिली हिरवी बुलिश कॅण्डल असून दुसरी लाल ही बेरीश कॅण्डल असते.
  • ह्या कॅण्डल आपणास त्या शेअर मधील ओपन, क्लोज, लो, हाय ह्या चार किमंती दाखवते. हे चार्ट दिसण्यास व वापरण्यास खूप सोपे असतात.

४. रेनको चार्ट (Renco chart)

  • रेनको चार्ट हे नाव जपानी शब्द  रेंगा (विटा) या शब्दावरून ठेवले आहे .या चार्ट पॅटर्न मध्ये लहान बॉक्सच्या लाईन दिसतात.
  • हिरवे बॉक्स लाईन तेजी दाखवतात तर लाल बॉक्स लाईन मंदी दाखवतात. 
  • ह्या चार्टचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे ट्रेंड अचूक दाखवतो कारण इतर चार्टमध्ये एक दिवसिय तेजी किंवा मंदी असेल आणि मंदी दिसत असेल, तर रेनको चार्ट मध्ये जर ट्रेंड अप असेल तर यातील बॉक्स या चार्ट मध्ये बुलिश ट्रेंड दाखवतो. 
  • यामध्ये प्राईजला खूप महत्व आहे. त्यामुळे हा ट्रेंड फ्लो दाखवतो. पोजिशनल ट्रेडिंग मध्ये सपोर्ट रेसिस्टंटच्या सह्याने काम केले तर खूप फायदा होतो त्यामुळे चार्ट पॅटर्न खूप उपयुक्त ठरतो.

५. हेकीनशी ( Heikin ashi )

  • हेकीन अशी (हेकीन म्हणजे आवरेज व अशी म्हणजे पेस). हा ऍव्हरेज पेस ऑफ प्राईज दाखवतो.
  • हा पॅटर्न नॉर्मल कॅन्डलप्रमाणे दिसत नाही यात गॅप दिसत नाहीत तर कॅन्डल सलग लाल, हिरव्या पॅटर्न मध्ये दिसतात.
  • सरासरी हा मागील कॅन्डलच्या मध्यवर्ती किमंतीने ओपन होतो. तसेच क्लोज हा मेन कॅन्डलच्या ओपन + हाय + क्लोज +लो याची बेरीज करून त्याला ४ ने भागले की जी किमंत येते ती त्याचा क्लोज असतो.

अशाप्रकारे ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करताना वेगवेगळ्या चार्टच्या साहाय्याने काम केले, तर आपणास बाजारातील खरेदी विक्रीची वेळ समजते. कमी कालावधीत जास्त फायदा मिळू शकतो किंवा कमी तोट्यामध्ये आपण एखाद्या शेअरमधून बाहेर पडू शकतो. वेगवेगळे चार्ट पॅटर्न आपणस शेअरचा सपोर्ट, रेसिस्टंट ,ओव्हर सोल्ड, ओव्हर बॉट दाखवतात म्हणून तांत्रिक विश्लेषणामध्ये चार्ट हा महत्वपूर्ण भाग आहे. 

 

Comments