माकड आणि गारुडी
एका गावात एक गारुडी राहत असतो. त्या गारुडीकडे काही साप, एक माकड आणि इतर प्राणी असतात. तो गावोगावी जाऊन साप, माकड आणि दुसऱ्या प्राण्यांचे वेगवेगळे खेळ करून लोकांची करमणूक करायचा. त्याचे खेळ लोकांना आवडत असे त्यामुळे त्या प्राण्यांच्या जीवावर त्याचे पोट चालले असे. तो क्रूर गारुडी माकडाकडून आणि सापांकडून फक्त खेळच करून घेत असे.
त्यांना पोटभर खायला देत नसे. एक दिवस काहीच कारण नसताना गारुडयाने माकडाला खूप मारतो. मग माकड गारुडयाची नजर चुकवून लांब पळून जाते.
आता गारुडयाकडे फक्त साप उरतात. गारुडी त्यांचे खेळ करू लागतो. पण लोकांना आता त्याचे खेळ आवडेनासे झाले. जास्त पैसेही मिळत नव्हते. मग गारुड्याला कळलं कि लोकांना आपला खेळ माकड असल्यामुळे आवडायचा. आता तो गारुडी माकडाला शोधू लागतो. गारुड्याला माकड एका झाडावर बसलेलं दिसते.
गारुडी अश्रू भरल्या डोळ्यांनी माकडाला म्हणाला, ' माझ्या प्रिय माकडा, मला तुझी खूप आठवण येते ' माकड त्याला म्हणते, 'तुला माझी आठवण येते कारण लोकांना आता तुझा खेळ आवडत नाही', आणि माकड तिथून पळून जाते. गारुड्याला त्याची चूक कळते आणि तो आपल्या प्राण्यांबरोबर प्रेमाने वागायला सुरुवात करतो.
तात्पर्य - जसाच तसे.
Comments
Post a Comment