दोन मित्र


 दोन मित्र


दोन उंदीर एकमेकांचे खूप जिवलग मित्र होते. त्यातला एक उंदीर गावात राहत होता. दुसरा शहरात राहत होता. एक दिवस शहरात राहणारा उंदीर गावाकडे मित्राला भेटण्यासाठी गेला. गावातल्या उंदराने त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला. गावातल्या उंदराने त्याच्या मित्राला रात्रीचे जेवण स्वत:च्या घरी दिले. आपल्या मित्राच्या स्वागतासाठी चांगले जेवण त्याला खाऊ घातले. शहरातला उंदीर या जेवणाने फारसा प्रसन्न झाला नाही.


मित्रावर प्रभाव टाकण्यासाठी तो म्हणाला,"तू मला हे काय खायला घालत आहेस ? माझ्या घरी ये. मग बघ मी तुला कसे शाही जेवण देतो " गावातल्या उंदराला त्याच्या आमंत्रणाने खूप आनंद झाला. त्याने त्याच्या मित्राला शहरात येण्याचे वचन दिले.


काही दिवसांनी गावातला उंदीर ठरल्याप्रमाणे आपल्या शहरातल्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला. शहरी उंदराने मित्रासाठी पंचपक्वान्न मेजवानी तयार केलेली होती. आता ते जेवायला बसणार तेवढ्यात त्यांनी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. दोघेही घाबरून लपले. तेवढ्यात दोन कुत्रे खोलीत आले. उंदीर एवढे घाबरले कि, ते घरातून पळूनच गेले.


मग गावातला उंदीर आपल्या मित्राला म्हणाला, "मी तर चाललो माझ्या गावी. माझे गाव तुझ्या शहरापेक्षा खूप सुरक्षित आणि छान आहे.

Comments