पुरोहिताचा बदला


 पुरोहिताचा बदला


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाच्या मालकीची एक खूप मोठी फळांची बाग होती. त्या बागेत खूप माकडे रहात होती. एकदा त्या बागेतून राजपुरोहित जात होते. त्या बागेतील माकडांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यामुळे पुरोहित चिडले त्यांनी या त्रासाचा बदला घेण्याचा ठरविले.


त्यामुळे माकडांच्या प्रमुखाला काळजी वाटू लागते. तो सगळ्या माकडांना बाग सोडून जायला सांगतो. पण काही माकडे ती बाग सोडून दुसरीकडे जातात आणि काही माकडे तिथेच राहतात. 

काही दिवसांनी राजाच्या तबेल्याला आग लागते आणि त्या आगीत खूप घोडे पोळले जातात. राजा चिंतेत पडतो मग तो आपल्या पुरोहिताला सल्ला विचारतो.


पुरोहिताला माकडांचा सूड घेण्यासाठी ही खूप मोठी संधी असते. तो राजाला सांगतो की, 'घोड्यांना बरं करण्यासाठी माकडांचे मांस जखमेवर लावणे सर्वात उत्तम ! लगेचच राजा त्याच्या सैनिकांना सांगतो की बागेतल्या सगळ्या माकडांना मारून टाका आणि त्यांचे मांस आणा.


अशाप्रकारे ज्या माकडांनी त्यांच्या प्रमुखाचे ऐकले नाही त्यांना प्राण गमवावे लागले.


तात्पर्य - जसाच तसे.

Comments