शेतकरी आणि सोनं


 शेतकरी आणि सोनं


खूप वर्षापूर्वी गोष्ट आहे. एका गावात एक खूप श्रीमंत माणूस रहात होता. त्याच्याकडे खूप सोनं होत. त्या श्रीमंत माणसाला भीती वाटत असे की चोर आल्यावर आपले सगळे सोनं चोरून घेऊन जातील.


चोरांनी सोन चोरू नये म्हणून त्याने ते सोनं शेतात खड्डा करून पुरून ठेवले होते. खूप वर्षे जातात. तो श्रीमंत माणूस निधन पावतो. पुढे त्या श्रीमंत माणसाचे शेत एक गरीब शेतकरी विकत घेतो.


एकदा शेतजमीन नांगरत असताना शेतकऱ्याचा नांगर कशावर तरी आपटतो. मोठा आवाज होतो. शेतकऱ्याला वाटते की दगड असावा म्हणून शेतकरी अजून खोदू लागतो. शेतकरी खाली पाहतो तर खूप सोनं असतं. त्याला खूप आश्चर्य वाटते.


शेतकरी ते सोनं घरी न्यायचे ठरवतो. दिवसा सोनं घरी नेताना कोणी तरी पाहील या विचाराने तो सोने रात्री न्यायचे ठरवतो. शेतकरी ठरल्याप्रमाणे रात्री येतो आणि सोनं बाहेर काढतो. ते एका गाठोड्यात गोळा करतो. उचलतो तर ते खूप जड असते. त्याला पेलवतच नाही. ओढत फरफटत नेण्याचा प्रयत्न करतो, पण तेही शक्य होत नाही.


तो बसून विचार करतो की हे सोने घरी कसे न्यावे. तो ते सोनं चार भागात विभागतो एका वेळी एक भाग असे करून चारही भाग सहजपणे घरी नेतो. कालांतराने एक यशस्वी श्रीमंत शेतकरी म्हणून तो आयुष्य जगू लागतो.

Comments