हुशार मुलगा आणि चोर


हुशार मुलगा आणि चोर


फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही.


एके दिवशी चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पहिले. तो मुलगा रडत होता. चोराने त्याला विचारले, "तू का रडत आहेस?" मुलाने त्याला दोरीचा एक तुकडा दाखवून म्हटले की, "या विहिरीत, माझी चांदीची बादली पडली आहे."


चोराने विचार केला, "पहिली मी याची बदली काढून देतो. मग याची बादली चोरुयात". विचार करून चोर मुलाला म्हणाला,"तू रडणे थांबव" मी बादली शोधून काढतो.


त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला. त्याने पहिले की, मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते व चोर स्वताच फसला होता.


तात्पर्य - गर्वाचे घर खाली.

Comments