कपटी साप आणि लाकुडतोड्या
हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले.
लाकुडतोड्याला सापाची द्या आली.
त्याला माहित होते की, जर सापाला
अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न
कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल.
लाकुडतोड्याने सापाला आपल्या
लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले.
थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला.
हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला.
तात्पर्य - उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते.
Comments
Post a Comment