मूर्ख मुलगा आणि मध माशी


 मूर्ख मुलगा आणि मध माशी


एका गावात एक लाकूडतोड्या होता. तो खूप मेहनती होता. लाकूडतोड्याचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगु लागते. लाकूडतोड्याचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि लाकूडतोड्याला चावे घेऊ लागते.


लाकूडतोड्या मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली? मधमाशी पुन्हा लाकूडतोड्याच्या डोक्यावर बसून त्याला चावू लागली. आता मात्र लाकूडतोड्या खूप चिडतो.


लाकूडतोड्या त्याच्या मुलाला बोलावत आणि सांगतो. बाळ, या मधमाशीला मार बर, मला खूप त्रास देत आहे. लाकूडतोड्याचा मुलगा वडिलांचे ऐकणारा असतो, पण खूप मूर्ख असतो.


वडिलांच्या डोक्यावर मागच्या बाजूला मधमाशी बसलेली असते. मुलगा एक काठी घेतो व वडिलांच्या मागे जातो. सर्व ताकत एकवटून डोक्यावर बसलेल्या मधमाशीच्या अंगावर जोरदार काठीचा प्रहर करतो. मधमाशी तिथून उडून जाते आणि काठी लाकूडतोड्याच्या डोक्यात बसते. लाकूडतोड्या जखमी होतो. अशा मूर्ख मुलाचा प्रताप सुताराला भोगावा लागतो.


तात्पर्य - आती शहाणा त्याचा बैल रिकामा

Comments