गाढवाला मिळाली शिक्षा
एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे.
एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि मग ते दोघे पुन्हा चालू लागतात. थोडेसे मीठ पाण्यात विरघाल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि ते खूप आनंदी होऊन पुढची वाटचाल करू लागते.
आता दरोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसारवू लागले. गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचे ठरवतो.
दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो. गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घासारावते आणि पाण्यात पडते. आजपण त्याचा मालक उठवण्यास मदत करतो पण गाढवाला काही उठता येत नाही कारण, कापसाने पाणी शोषून घेतलेले असते. त्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते.
तात्पर्य - आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे.
Comments
Post a Comment