पती, पत्नी आणि गाढव
एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात . एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला, "पहा! पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे." हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला.
तेवढ्यात कोणी तरी म्हटले, "अरे व्वा! बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत?" तिच्या पतीला काहीच सुचेना की काय करावे. लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून पती आणि पत्नी दोघेही एकदमच गाढवावर बसले.
काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली, "केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की!"
लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी चालू लागले. ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि, "गाढव असून पण पायी चालत आहे ".
तात्पर्य- आपण योग्य मार्गावर आसू तर आपण लोकांच्या उल-सुलट प्रतिक्रियांकडे लक्ष देता कामा नये.
Comments
Post a Comment