भूतांचे प्रकार
real horror stories in marathi: "कोकणात १४ प्रकाराची भूते प्रसिद्ध आहेत. एका अनाम व्यक्तीकडून मिळालेली हि पुढील माहिती.
१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात. कोकणातील पिशाच्च हे वेताळाच्या आधीन असतात. जो अंगातून भूत काढणारयाच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.
२) ब्रम्हग्रह / ब्रम्हराक्षस: हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते. जो वेदात निपुण आहे. पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अन्त झाला.
३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किव्वा तीठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला(निर्वंशी) ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. याला जर कोणी देवथ्यानाच्या पुढे केले तर देवथ्यान देखील पुढे येत नाहि.
४) देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्ना नंतर थोड्याच दिवसात मरतो. हि भूते गावाच्या चारी बाजूला असतात. कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळविण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, खोबरे द्यावे लागते.
५) मुंजा: हे ब्राम्हनांपैकी भूत असते. जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते. याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवर्ण्याचे काम करते.
६) खवीस: हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फार त्रासदायक भूत असते. ज्याला अतिशय क्रुर रीत्या मारले जाते. तो मेल्यानंतर खवीस होतो असा समाज आहे.
७) गिर्या/गिऱ्हा: जो माणूस बुडून मेला किव्वा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसर्याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असते. रात्रीच्या प्रहरात जर कोणी नदी किव्वा खाडी पार करताना याच्या तावडीत घावाला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले, मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनतो. त्याला हवे ते आणून देतो. प तो केस त्याला पुन्हा मीळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकट सोडतो.
८) चेटकीण: हे मागासर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ ) झोटिंग: हे भूत खारवी किव्वा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.
१०) विर: हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते.
११) लावसट: ओली बाळन्तिन मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्युनंतर लावसट मध्ये होते.
१२) खुन्या: हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते.
१३) बायंगी: हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा, गोळवशी किव्वा मालवण चौक येथे सुमारे दहा हजार रुपयांना हे विकत मिळते. हे भूत मालकाची भरभराट कराते आणि शत्रूला त्रास देते.
१४) चकवा: हे रात्री बेरात्री जंगलात किव्वा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकाविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही.
Comments
Post a Comment